
📅 दिनांक: १५ जुलै २०२५
✍️ लेखक: कमलेश लोखंडे
📢 प्रकाशक: आपले आलेसूर टीम
आलेसूर येथील २१ वर्षीय तरुण कार्तिक (टोलू) राजू राऊत याचा जंगलात सर्पदंश झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
त्याच्या अकस्मात मृत्यूने गावात मोठी शोककळा पसरली आहे. आलेसूरमध्ये झालेल्या अंत्यसंस्काराला मित्र, नातेवाईक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.
या दुर्दैवी घटनेमुळे गावात सर्पदंश सुरक्षिततेबाबत जनजागृती झाली आहे. ग्रामस्थांना विशेषत: पावसाळ्यात शेतात किंवा जंगलात अनवाणी न चालण्याचा आणि पुढील मार्ग तपासण्यासाठी काठी बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. सर्पदंश झाल्यास व्यक्तीला शांत ठेवून कोणतेही घरगुती उपाय न करता तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला जात आहे.
✉️ ईमेल: aaplealesur@gmail.com
Rest in peace 🙏 😕